Board Exam Results 2022 : निकाल जवळ आला!!! 10 वी, 12 वीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात!

करिअरनामा ऑनलाईन | 10 वी, 12 वीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले (Board Exam Results 2022) असून, 6 किंवा 7 जूनला बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली. मंडळाच्या राज्यभरातील 9 ही विभागीय कार्यालयांमार्फत परीक्षा झाल्यानंतर लगेचच निकालाचे काम सुरू करण्यात आले होते.

हे काम अंतिम टप्प्यात असून, 6 किंवा 7 जूनला 12 वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली.
बारावीच्या निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
त्याचसोबत दहावीच्या निकालाचे कामही अंतिम टप्प्यात असून, बारावीनंतर लगेचच आठवडाभरात म्हणजेच जूनच्या 3 ऱ्या आठवड्यात दहावीचा निकाला जाहीर केला जाणार आहे.

नाशिक विभागाची आघाडी

  • मंडळाच्या 9 ही विभागांपैकी नाशिक विभागाचे निकालाचे काम सर्वप्रथम पूर्ण झाले होते.
  • मे महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिक विभागाचे काम पूर्ण झाल्याची माहिती विभागीय मंडळामार्फत देण्यात आली.
  • बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातील एक लाख 63 हजार 679 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
  • कोरोनामुळे दोन वर्षे परीक्षाच न झाल्यामुळे सूत्र वापरून निकाल जाहीर करण्यात आला होता.
  • विद्यार्थ्यांना दोन वर्षे परीक्षेचा सराव नसल्यामुळे यंदा 10 वी तसेच 12 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याची, तसेच आपापल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

अकरावीच्या प्रवेशाला गती (Board Exam Results 2022)

  • 10 वीच्या निकालानंतर 11 वीला प्रवेश घेण्याची लगबग सुरू होते.
  • हे लक्षात घेत शिक्षण संचालनालयाने 11 वीचे प्रवेश अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली असून, नोंदणीसह अर्जाचा भाग एक भरण्यास सुरुवात झाली आहे.
  • 10 वीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा भाग दोन भरण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले होते.
  • जूनच्या तिसऱ्या आठवड्यात 10 वीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होणार आहे.
  • त्यामुळे जुलै महिन्यापासून 11 वीच्या प्रवेश फेऱ्यांचे नियोजन जाहीर केले जाऊ शकते.

निकाल कसा पाहाल –

  1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  3. तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा. (Board Exam Results 2022)
  4. “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
  5. महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / 10वीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
  6. भविष्यातील वापरासाठी Save करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com