BMC Recruitment : मुंबई महापालिकेत थेट मुलाखतीव्दारे होणार निवड; ‘या’ पत्त्यावर राहा हजर

करिअरनामा ऑनलाईन । मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी (BMC Recruitment) आनंदाची बातमी आहे. मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

‘ही’ पदे रिक्त –

लोकमान्य टिळक महाविद्यालयातील बधिरिकरणशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या २८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे कंत्राटी स्वरुपाची असणार आहेत. या (BMC Recruitment) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विषयात पदव्युत्तर पदविका (एम.डी पदवी, डीएनबी किंवा एम.एस) पूर्ण करणे आवश्यक आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (BMC Recruitment)

  1. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदविका (M.D./D.N.B./M.S.) असणे आवश्यक.
  2. उमेदवारांना मान्यताप्राप्त महाविद्यालयात तीन वर्षाचा शिक्षक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  3. नोकरीचा कालावधी चार महिन्यांचा असणार आहे. त्यानंतर एक दिवसाचा सेवाखंड देऊन पुनर्नेमणूक केली जाणार आहे.

वय मर्यादा –

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे.

मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. (BMC Recruitment)

मिळणारे वेतन –

सायन रुग्णालयात बधिरिकरणशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. रेझ्युमे
  2. दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला,
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

सूचना –

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. (BMC Recruitment)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 डिसेंबर 2022 (PDF पहा)

मुलाखतीची तारीख – 15 डिसेंबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 11:30 वाजता

मुलाखतीचा पत्ता –

अधिष्ठाता लोकमान्य टिळक महानगरपालिका, वैद्यकीय महाविद्यालय, कॉन्फरन्स हॉल,  शिव, मुंबई – 22

येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

महत्वाचे –

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन (BMC Recruitment) काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com