Good News: MPSC संदर्भात सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन – MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय दिला आहे. MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे परीक्षा झाल्या नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. अशा विद्यार्थ्यांना सरकारच्या या निर्णायामुळे मोठा दिलासा मिळाला आहे,

कोरोनामुळे MPSC परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांची खूप गैरसोय झाली. त्यांच्या परिक्षेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. वयोमर्यादा ओलांडलेलेल अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. अशा विद्यार्थ्यांनसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर 2021 अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com