दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ,सर्व विद्यापीठाच्या परीक्षा केल्या रद्द

करियरनामा ऑनलाईन | कोरोना विषाणूच्या वाढत्या कहरांमुळे दिल्ली सरकारने महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आपल्या सर्व विद्यापीठांच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या संदर्भात ट्विट केले.

दिल्लीत कोरोना व्हायरस पॉझिटिव्हची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दिल्लीत सध्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये क्वारंटाइन सेंटर उभारली आहेत. तेथे परीक्षा घेणे शक्य नाही. सर्व परिस्थिती लक्षात घेता दिल्ली सरकारने निर्णय घेतला की सध्या कोणत्याही राज्य विद्यापीठात त्यांची परीक्षा होणार नाही.

त्याअंतर्गत महाविद्यालय, विद्यापीठात घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचादेखील समावेश आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, दिल्लीतील सर्व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही आणि विद्यार्थ्यांचा निकाल मागील परीक्षांच्या मूल्यांकनाच्या आधारे तयार केला जाईल. सरकारचा हा निर्णय तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही लागू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com