BHEL Recruitment 2022 : इंजिनिअर्सची निराशा संपली; आता BHEL कंपनीत मिळेल जॉब; कुठे आणि कसा कराल अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन। भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर (BHEL Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात काढण्यात आली आहे. अभियंता, पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे.

संस्था – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, नागपूर (Bharat Heavy Electrical Limited, Nagpur)

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2022

पद – (BHEL Recruitment 2022)

अभियंता (Engineer)

पर्यवेक्षक (Supervisor)

एकूण जागा – 08 पदे

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • अभियंता (Engineer) –
  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • पर्यवेक्षक (Supervisor) –
  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वेतन –

अभियंता (Engineer) – 78,000/- रुपये प्रतिमहिना

पर्यवेक्षक (Supervisor) – 43,550/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला (BHEL Recruitment 2022)
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) भेल, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 345 किंग्सवे, नागपूर – 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2022

सविस्तर माहितीसाठी येथे CICK करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.bhel.in/bhel/jsp/#openings या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com