वर्षातल्या ‘या’ महिन्यामध्ये JOB शोधणे उत्तम ; जाणून घ्या

करिअरनामा । आजकाल उच्चशिक्षित असो की कमी शिकलेला सर्वजण छोटी-मोठी नोकरी शोधतचं असतात. परंतु नोकरी शोधत असताना आपण पगारालाही महत्व देतो. जिथे चांगला पगार भेटेल तिथे नोकरी करण्याला अनेकजण महत्व देतात. त्यामुळे तुम्हाला जर चांगल्या पगाराची नोकरी लागावी अशी अपेक्षा असेल तर कोणता महिना नोकरी शोधण्यासाठी चांगला आहे. ते आपण जाणून घेवू. Best time to find a job

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिने जॉब शोधण्यासाठी चांगले आहेत. कारण वर्षाच्या अखेरपर्यंत बजेट आदीशी संबंधित कामे होऊन जातात. त्यामुळे पगार आणि हायरिंगचे निर्णयही घेऊन झालेले असतात. परिणामी यात तीन महिन्यात जॉब व्हेकन्सी निघते.

पहिली नोकरी असो किंवा बेटर प्रॉस्पेक्टसाठी शोधायचा जॉब एप्रिल, मे आणि जून हे वर्षातले बेस्ट महिने आहेत. या महिन्यात सर्वाधिक लोक नोकरी बदलतात. त्यामुळे जवळपास प्रत्येक कंपनीत जॉब व्हेकन्सी निघते. इतकंच नव्हे तर चांगली सॅलरीही ऑफर केली जाते. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून हे महिने नोकरी शोधण्यासाठी उत्तम आहेत.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात नोकरी मिळणं खूपच कठीण असतं. जर कुठे नोकरीची संधी असेलही तरी ती तितक्या तोडीची नसते, जितकी ती जानेवारी ते जूनमध्ये असते. कारण या महिन्यात जवळपास सर्वच कंपन्यांची हायरिंग प्रोसेस पूर्ण झालेली असते.

आक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये लोक आपलं उत्पन्न स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नात असतात, त्यामुळे नोकरी सोडण्याचा विचार करत नाहीत. मात्र एखाद्या कंटेंट जनरेट करणाऱ्या कंपनीत नक्की या काळात नोकरीच्या संधी असतात. त्यामुळे तुम्ही या महिन्यात नोकरी शोधू शकतात.

नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता जॉब अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.