बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेचा पर्याय

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षांतर्गत २१ ते २३ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे.याच दरम्यान राज्यातील कृषी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षाही सुरु आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र,अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाद्वारे विशेष परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नसून त्यांना विशेष परीक्षेमध्ये त्या दिवसाचा पेपर देता येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानंतर राज्यातील सर्व विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन केले आहे.२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान बी.एड. सीईटी परीक्षा होणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी सकाळी १० व दुपारी २ वाजता अशा दोन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे.याच दरम्यान पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षा आहेत.

बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे पदवी अंतिम वर्षाचे असतात,तर काही विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असतानाही बी.एड. सीईटी देत असतात, मात्र अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाद्वारे विशेष परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.त्यामुळे बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखून विशेष परीक्षेसाठी आपल्या महाविद्यालयाकडे अर्ज करता येईल. काही विद्यापीठामध्ये या विद्यार्थ्यांची ऑनलाईन तर काही विद्यापीठामध्ये ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नसून त्यांनी गोंधळून जाऊ नये, असे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्याकंन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com