अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांची भरती(AEES)

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट|परमाणु ऊर्जा विभाग मुंबई, महाराष्ट्र येथील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अॅटोमिक एनर्जी एजुकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. १९६९ मध्ये मुंबईच्या अनुशासितिनगरमधील एका शाळेची स्थापना केली गेली.

अॅटोमिक एनर्जी एजुकेशन सोसायटी मध्ये  वेगवेगळ्या पदांसाठी ५७ जागांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१९ आहे लेखी परीक्षा ३०/३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहेत.

एकूण जागा : 57 जागा 

१- PGT (हिंदी)                – १

२- PGT (भौतिक शास्त्र)   – १

३- PGT (रसायनशास्त्र)    – १

४-TGT (इंग्रजी)              –  ४

५- TGT (हिंदी- संस्कृत)   – ८

६- TGT (गणित- भौतिकशास्त्र )- ४

७- TGT (रसायनशास्त्र- जीवशास्त्र) – १

८- TGT (समाजशास्त्र)      – ४

हे पण वाचा -
1 of 229

९- ग्रंथपाल                  – २

१०- विशेष शिक्षक       – १

११- PRT                   – ३०

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1 ते 3: (i) 60% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed.
  • पद क्र.4 ते 8: (i) 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.  (iii) CTET 
  • पद क्र.9: 60% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय विज्ञान पदवी/डिप्लोमासह कोणत्याही शाखेतील 60% गुणांसह पदवी 
  • पद क्र.10: (i)  कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 60% गुणांसह B.Ed.  (iii) CTET 
  • पद क्र.11: (i) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण/पदवीधर    (ii) D.El.Ed/B.El.Ed./D.Ed./B.Ed.  (iii) CTET 

वयाची अट: 20 जुलै 2019 रोजी,  [SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 3: 40 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.4 ते 10: 35 वर्षांपर्यंत 
  • पद क्र.11: 30 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹750/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

लेखी परीक्षा: 30, 31 ऑगस्ट 2019 & 01 सप्टेंबर 2019 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2019

जाहिरात (Notification): पाहा

Get real time updates directly on you device, subscribe now.