7 डिसेंबर । सशस्त्र सेना ध्वज दिन

करीअरनामा । मातृभूमीचे रक्षण करतांना झालेले शहीद आणि सशस्त्र दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी देशभरात 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो.

हा दिवस देशाच्या सीमारेषा यांचे रक्षण करणाऱ्या सैन्यांबद्दल व सैनिकांच्या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी प्रदान करतो. या दिवशी गोळा केलेला निधी सेवा देणारे कर्मचारी आणि माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी वापरला जातो.

आजचा दिवस आठवण करून देतो की सैनिक आणि त्यांचे कुटुंब यांचे कल्याण ही संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी आहे.

1949 पासून दरवर्षी भारतात 07 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षानुवर्षे हा दिवस भारतीय सैनिक, खलाशी आणि विमानाचालकांचा सन्मान म्हणून साजरा करण्याची परंपरा बनली आहे.

——————————————————-
Armed Forces Flag Day: December 7th.

CareerNama । Every year, December 7 is celebrated as Armed Forces Flag Day in honor of the martyrs and Armed Forces personnel guarding the homeland.

This day provides an opportunity to express our gratitude to the families of soldiers and soldiers who guard the country’s borders. The funds collected on this day are used for the welfare of service personnel and ex-servicemen.

This day reminds that the welfare of soldiers and their families is the responsibility of the entire nation.

Every year since 1949, in India, December 07 is celebrated as Armed Forces Flag Day. Over the years, it has become a tradition to celebrate Indian soldiers, sailors and aviators.