जात प्रमाणपत्रासाठी लवकर अर्ज करा; बार्टी’चे विद्यार्थ्यांना आवाहन

करियरनामा ऑनलाईन | चालू शैक्षणिक वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आरक्षित जागेवर प्रवेश घेण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे लवकरात लवकर अर्ज करावेत. असे आवाहन बार्टी म्हणजेच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात आले आहे. वेळेत अर्ज केल्यास विद्यार्थ्यांना पुढील त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सीईटी परीक्षा घेण्यात येते. यावर्षीच्या म्हणजे 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी काही दिवसात सीईटीची अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रवेश परीक्षेनंतर ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते.

प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची धावपळ होते. ही धावपळ टाळण्यासाठी वेळेतच अर्ज करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला नाही, त्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन पार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे. वेळेत अर्ज केल्यास विद्यार्थ्यांचे वेळेत प्रवेश निश्चित होऊन, त्यांची धावपळ आणि शैक्षणिक नुकसान टळू शकणार आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com