‘सेट’ परीक्षेच्या अर्जाची मुदत वाढली ; या तारखेपर्यंत करू शकता अर्ज

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत सहायक प्राध्यापक पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या राजस्तरीय पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे . अर्ज भरण्यास आठ दिवसाची मुदत वाढ दिली असून २९ जानेवारी पर्यंत विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकता .

विद्यापीठाच्या राजस्तरीय पात्रता परीक्षेसाठी काही विद्यार्थाना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज करता आला नाही यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख २१ जानेवारी वरून २९ जानेवारी करण्यात अली आहे . विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी २२ ते २९ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे . विद्यापीठामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा २८ जूनला घेण्यात येणार आहे .

अर्जातील काही दुरुस्त्या असेल तर ६ फेब्रुवारी पर्यंत सुधारणा करता येणार आहे . परीक्षेसाठी सादर करण्यात येणारे क्रिमिलियर प्रमाणपत्र २०१९- २० चे वैध असणे आवश्यक आहे .

अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा –

हे पण वाचा -
1 of 215

अर्ज करण्याची मुदतवाढ -२२ ते २९ जानेवारी

अर्ज दुरुस्तीची मुदतवाढ –३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी

परीक्षेची तारीख – २८ जून

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob” 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: