अंगणवाडी सेविकांना सरकारी नोकर समजावे ; भारतीय मजूर संघाची मागणी…

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । देशात अनेक वर्षांपासून अंगणवाडीमध्ये अनेक महिला काम करतात. या महिलांना सरकारी नोकर समजावे, अशी मागणी भारतीय मजूर संघाने केली आहे. 

अंगणवाडीतच काम करणाऱ्या महिला नाहीतर अशा शाळेतील जेवण तयार करणारे कर्मचारी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लोकांनाही सरकारी नोकर समजून त्यांना योग्य सुविधा देण्याची गरज असल्याचे संघाने शनिवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी राज्य आणि केंद्र सरकारकडे   आपले गाऱ्हाने मांडत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान केंद्र सरकारचे धोरण सरकारी उद्योग आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात असल्याबद्दल भारतीय मजदूर संघ पुढील शुक्रवारी राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करणार आहे. या आंदोलनात निर्गुंतवणूक खासगीकरण आणि कर्मचाऱ्यांसाठीच्या नकारात्मक धोरणाविरोधात आवाज उठवण्यात येईल. हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

_—-__

हे पण वाचा -
1 of 333

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

 

Get real time updates directly on you device, subscribe now.