AIR INDIA Recruitment 2022 : AIR India मध्ये नोकरीची संधी!! 50 हजारपर्यंत मिळेल पगार; त्वरा करा

करिअरनामा ऑनलाईन | एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे (AIR INDIA Recruitment 2022) मॅनेजर ऑफ फायनान्स, ऑफिसर अकाउंट्सआणि असिस्टंट ऑन अकाउंट्स या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत वेबसाइट – airindia.in

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

पदे – मॅनेजर ऑफ फायनान्स, ऑफिसर अकाउंट्स, असिस्टंट ऑन अकाउंट्स

निवड माध्यम – मुलाखत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022

आवश्यक पात्रता आणि वेतन – (AIR INDIA Recruitment 2022)

  • मॅनेजर फायनान्स –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातून चार्टर्ड अकाउंटंट किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियातून कॉस्ट अकाउंटंट पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकार रुपये इतका पगार दिला जाईल.

  • ऑफिसर अकाउंट्स –

या पदासाठी उमेदवार इंटर चार्टर्ड अकाउंटंट / इंटर कॉस्ट अँड मॅनेजमेंट (AIR INDIA Recruitment 2022) अकाउंटन्सी किंवा फायनान्समध्ये MBA किंवा समकक्ष पात्रता असणारा असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 41 हजार 500 रुपये इतका पगार दिला जाईल.

  • असिस्टंट अकाऊंट –

या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीधर (ऑनर्स) असावा. तसेच त्याच्याकडे संबंधित कामाचा किमान 1 वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 19 हजार 350 रुपये इतका पगार दिला जाईल.

सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी येथे CLICK करा

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com