ऑल इंडिया लॉ (AILET 2020) प्रवेश परीक्षा लांबणीवर

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना (कोविड 19 ) विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU) दिल्लीने AILET 2020 एन्ट्रन्स परीक्षा  स्थगित केली आहे. ही परीक्षा 18 ऑगस्ट रोजी होणार होती परंतु  ही परीक्षा स्थगित केल्यामुळे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीने उमेदवारांना आवाहन केलं आहे की कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. AILET 2020 शी संबंधित  माहिती युनिव्हर्सिटीचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

AILET 2020 परीक्षेच्या मागोमाग CLAT 2020 परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे.कोविड – 19 महामारी संक्रमण स्थिती सामान्य होत नसल्याने परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com