इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी AICTE ची स्कॉलरशीप

करिअरनामा ऑनलाईन ।  ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची (AICTE) मान्यता असलेल्या संस्थेतून बीई / बीटेक किंवा अन्य कोणतीही तंत्रविषयक पदवी किंवा पदविका कोर्स करत आहात तर तुम्हाला स्कॉलरशीप मिळवण्याची संधी आहे. एआयसीटीईच्या दोन शिष्यवृत्तींसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या दोन स्कॉलरशीप्सची नावे आहेत – एआयसीटीई प्रगती स्कॉलरशीप  आणि एआयसीटीई सक्षम स्कॉलरशीप.या स्कॉलरशीप्स साठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज प्रक्रिया नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलद्वारे पूर्ण करायची आहे. तुम्ही ३१ डिसेंबर २०२० पर्यंत यासाठी अर्ज करू शकता.

प्रगती स्कॉलरशीप केवळ मुलींसाठी आहे तर सक्षम स्कॉलरशीप दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी यापूर्वीच या शिष्यवृत्तींचा लाभ घेत आहेत, त्यांना नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागेल. असे विद्यार्थी aicte-pragati-saksham-gov.in द्वारे ऑनलाइन रीन्यूअल फॉर्म भरू शकतील.

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com