कौतुकास्पद! चहावाल्याची मुलगी झाली वायुसेनेत अधिकारी

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त केलेल्या कु. गंगवाल यांनी उप-निरीक्षक म्हणून मध्य प्रदेश येथील पोलिस विभागात नोकरी केली. नंतर, कामगार निरीक्षक म्हणून गुणवत्तेत आल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. तिच्या या यशाचे कौतुक प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून केले आहे.

“सैन्यात सामील होण्यापूर्वी मी पोलिसात आठ महिने काम केले.” असे त्यांनी सांगितले. पदवीनंतर तिने एएफसीएटी साठी प्रयत्न सुरु केले होते. तिच्या सहाव्या प्रयत्नात तिची एसएसबी साठी निवड झाली. तिला मिळालेल्या यशाने तिचे सर्वजण कौतुक करत आहेत.

हे पण वाचा -
1 of 12

‘मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील चहा विक्रेत्यांची मुलगी आंचल गंगवाल ही भारतीय वायुसेनेत अधिकारी म्हणून कार्यरत झाली आहे. तिने आयएएफ अकादमीमध्ये अव्वल स्थान पटकावले आणि राष्ट्रपती पदक पटकावले आहे. महिला सशक्तीकरण हा एक पुढचा मार्ग आहे.’ असे ट्विट जावडेकर केले आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: