UGC च्या निर्णयाविरोधात आदित्य ठाकरे सर्वोच्च न्यायालयात; अंतिम वर्षांच्या परिक्षांसंदर्भात पिटीशन केली दाखल

मुंबई । कोरोना संक्रमणामुळे राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या मात्र केंद्र सरकारकडून सर्व काळजी घेऊन तसेच सामाजिक अलगावचे नियम पाळून परीक्षा घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावर पुन्हा चर्चा करून राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा निर्णय कायम केला होता. आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयाला कायदेशीर रित्या विरोध करत पिटिशन दाखल केली आहे.

आदित्य ठाकरे यांची ही पिटिशन अद्याप सुनावणीसाठी घेण्यात आली नाही आहे. मात्र याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात संक्रमण होत असल्यामुळे विद्यार्थी तसेच पालक यांनी संक्रमणाच्या भीतीमुळे या परीक्षांना विरोध केला आहे. मात्र परीक्षा आवश्यक असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षा घेणे गरजेचे आहे असे युजीसी चे म्हणणे आहे.

सध्या या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यात होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. मात्र केंद्र सरकारचा आदेश हा परीक्षा घ्याव्या असा आहे. त्याबद्दल एक मार्गदर्शक सूचीही जारी करण्यात आली होती. ज्यामध्ये ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com