Accor Recruitment 2022 : Experience किंवा Resume शिवाय मिळणार Job!! ‘Accor’ कंपनी देतेय 35 हजार नोकऱ्या

करिअरनामा ऑनलाईन |  युरोपातील प्रमुख हॉटेल्समध्ये सध्या कर्मचाऱ्यांची खूपच कमतरता आहे. ही (Accor Recruitment 2022) समस्या सोडवण्यासाठी युरोपातील प्रमुख हॉटेलांची चेन आता कुठल्याही अनुभवाशिवाय किंवा कुठल्या रेझ्युमेशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यास तयार आहे. हॉटेलच्या अधिकाऱ्यांचेही असे म्हणणे आहे, की कमी पगारात कर्मचारी ठेवल्यामुळे त्यांना खूप नुकसान सोसावे लागत आहे.

110 देशांमध्ये Accor चा विस्तार 

Accor ला सध्या भारतासह जगभरात 35 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. Accor कंपनी सुमारे 110 देशांमध्ये मर्क्युरी, इबिस, फेयरमाउंट इत्यादी हॉटेल ब्रँड्स ऑपरेट करते. कंपनीला (Accor Recruitment 2022) कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक तुटवडा स्पेन आणि पोर्तुगाल मध्ये भासत आहे. करोना काळानंतर ही परिस्थिती उदभवली असल्याचे Accor चे म्हणणे आहे.

युरोप हॉटेल उद्योगात कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा (Accor Recruitment 2022)

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, करोनानंतर वाढलेली टूरिस्टची संख्या आणि त्याअनुषंगाने वाढलेली मागणी पूर्ण करताना युरोपातील हॉटेलांच्या नाकी नऊ येत आहेत. हजारो कर्मचाऱ्यांनी करोना काळात नोकऱ्या सोडल्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करोनाकाळात बंद राहिल्याने त्यांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले आहे. काही कर्मचाऱ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या, तर काही नोकरी सोडून गेलेले कर्मचारी परतलेच नाहीत. त्यामुळे युरोपातील हॉटेल उद्योगात सध्या कर्मचाऱ्यांचा खूप मोठा तुटवडा आहे.

Experience शिवाय मिळणार नोकरी 

हे पण वाचा -
1 of 64

युरोपातील सर्वात मोठी हॉटेल चेन एकॉर (Accor) ने ट्रायल म्हणून लोकांना कामावर घेण्यास सुरूवात केली आहे. सुरुवातीला ज्या लोकांना इंडस्ट्रीचा कुठलाही अनुभव नाही, अशांना देखील (Accor Recruitment 2022) कामावर ठेवले जात आहे. चीफ एक्झिक्युटिव्ह सेबेश्चियन बेजिन यांनी अलीकडेच रॉयटर्सला दिलेल्या एका मुलाखतीत ही माहिती दिली.

अशा मिळणार सुविधा 

Accor ला सध्या जगभरात 35 हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा सर्वाधिक स्पेन आणि पोर्तुगाल मध्ये दिसतो. येथे पर्यटन उद्योग करोनाच्या आधीच्या काळापासून 13 ते 15 टक्के इतकं जीडीपीत (Accor Recruitment 2022) योगदान देतो. हॉटेल व्यावसायिक म्हणूनच कर्मचाऱ्यांना अधिक वेतनासह, मोफत राहण्याची सोय, बोनस, आरोग्य विमा यासारखे लाभही देत आहेत

कर्मचाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी युरोपातील प्रमुख हॉटेलांची चेन आता कुठल्याही अनुभवाशिवाय किंवा कुठल्याही रेझ्युमेशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यास तयार होत आहे. हॉटेलांचे अधिकारीही हे मानत आहेत, की कमी पगारात कर्मचारी ठेवल्यामुळे त्यांना खूप नुकसान सोसावे लागले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com