नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होण्याची चिन्हे ; महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

करिअरनामा । नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी तसेच परिवहन सेवेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सातवा वेतन आयोग लागू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आमदार गणेश नाईक यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी नवी मुंबई महापालिकेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार महापौर जयवंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक सेनेचे अध्यक्ष डॉ. संजीव नाईक, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी सोमवारी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची भेट घेतली. यावेळी प्रधान सचिव म्हैसकर यांनी मागण्यांना तत्वत: मान्यता दिली.

त्यानुसार येत्या महिनाभरात सातवा वेतन आयोग लागू होईल अशी चिन्हे दिसत आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सातव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने या संबधी राज्य सरकारकडे पाठविलेला प्रस्ताव सरकार मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. नवी मुंबईच्या प्रगतीत महापालिका तसेच परिवहनचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सेवेचे मोठे योगदान आहे.  त्यामुळे त्यांच्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची सूचना आमदार गणेश नाईक यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना दिली होती.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.