पुण्यातील ५ वी ते ८ वी वर्गांच्या शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होणार; महापालिका आयुक्तांनी काढलं पत्रक

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ बंद असलेल्या शाळा सुरु करण्याला आता मुहूर्त मिळाला आहे. नववी ते बारावीच्या शाळा जानेवारी महिन्यात सुरु करण्याचे निर्देश याआधी प्रशासनाने दिले होते. आता पाचवी ते आठवीचे वर्गही योग्य ती खबरदारी घेऊन १ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या पत्राची प्रत ट्विट केली आहे. या पत्रामध्ये शाळा सुरु करताना घ्याव्या लागणाऱ्या खबरदारीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. शाळा सुरु करण्याआधी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना संदर्भातील RTPCR टेस्ट करणं बंधनकारक असणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गासह वर्गाबाहेरही मास्क लावण्याच्या सूचना पत्रात करण्यात आल्या आहेत.

शाळा सुरु होतानाच मुलांना पालकांचं संमतीपत्र शाळेत जमा करावं लागणार आहे. याशिवाय शाळेतील वर्ग हे दरवाजा, खिडक्या उघडे ठेवून आणि दिवसातून २ वेळा निर्जंतुक करुन घेण्याच्या सूचनाही प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com