पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल रखडला !

करिअरनामा ऑनलाईन । राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. याचबरोबर नव्याने सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात या परीक्षा नेमक्या कधी होणार याबाबतही कोणतीही सूचना न आल्याने पालकांचा संभ्रम वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 20 लाखांहून अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन तपासून निकाल जाहीर केला. मात्र ओएमआर शीटवर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेला जाहीर करता आलेला नाही. यामुळे पालकांमध्ये नाराजी आहे.

पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिली स्पर्धा परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेसाठी विद्यार्थी खूप परिश्रम करतात. या परीक्षेचे मूल्यांकन सोपे व्हावे या उद्देशाने संगणकीय प्रणालीचा वापर केला जातो. असे असतानाही परीक्षा परिषदेने अद्याप हा निकाल का जाहीर केला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या  7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com