50 दिवसांत TET परीक्षेची तयारी कशी कराल ?

Get real time updates directly on you device, subscribe now.

स्पर्धापरीक्षा विश्व । नितीन बऱ्हाटे 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी परीक्षा (MH TET) 19 जानेवारी 2020 रोजी जाहीर झाली आहे. 4 जानेवारी पासुन परीक्षेचे हाॅलतिकीट परीक्षार्थीना संकेतस्थळावर उपलब्ध होईल , अवघे 50 दिवस या परीक्षेच्या तयारीसाठी राहीले आहेत. या 50 दिवसांत TET परीक्षेचे स्वरुप समजुन घेऊन त्याची तयारी कशी करावी ? अभ्यासक्रम कसा आहे? कोणत्या पुस्तकातुन करावी? कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचे? या सर्व प्रश्र्नांची उत्तरे सदर लेखात आपण पाहू

RTE (शिक्षण हक्क कायदा) नुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत महाराष्ट्र राज्य शासनच्या सर्व
अनुदानित आणि विनाअनुदानित शाळेत शिक्षक पदावर रुजू होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आता अनिवार्य आहे. TET मधील 60% (90 गुण) आणि मागासवर्गीयांसाठी 55%(83 गुण) गुण मिळविल्यानंतर आपण ”शिक्षक अभियोग्यता चाचणी”(TAIT) परीक्षेला पात्र ठरतो. “टीईटी” घेण्याचे कार्य “राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षणपरिषदेवर (एनसीटीई)” सोपविले आहे .

टीईटी ची तयारी करताना सर्वप्रथम परीक्षेचे स्वरुप व अभ्यासक्रम समजुन घ्या त्यानंतर टीईटी च्या आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करुन घ्या , कोणत्या घटकावर किती प्रश्न आले आहेत? काठीण्यपातळी कशी आहे ? कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायला पाहिजे ? या सर्व गोष्टी बारकाईने समजून घ्या, त्यानुसार योग्य अभ्यास संदर्भ साहित्य निवडुन सर्व घटकांची व्यवस्थित तयारी करा. दरम्यान त्या स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका सोडवुन सराव करीत रहा.

पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)

पेपर (1)
(इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२
या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१- मराठी इंग्रजी उर्दु बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२ – इंग्रजी/मराठी
यामध्ये दोन्ही भाषेतील व्याकरण/उतारे/लेखक/कविता इत्यादींवर प्रश्र्न विचारले जातात.
अभ्यास संदर्भ साहित्य –
मराठी भाषा(30 गुण)
बाळासाहेब शिंदे/मो.रा.वाळींबे
इंग्रजी व्याकरण(30 गुण)
बाळासाहेब शिंदे/के सागर

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत सध्या राज्यात सुरु असलेला विहित पाठ्यक्रम लागू राहील.
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)‌संदर्भ साहित्य –
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (चौथी आवृत्ती),के सागर प्रकाशन

४) गणित :-
गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मुलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
गणित विषयाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.
1.गणित (30 गुण)
राज्य शासनाची पुस्तके,
अंकगणित – अभिनव प्रकाशन

५) परिसर अभ्यास :-
परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मुलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारीत असतील.
परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. १ ली व इ. २ री ला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पध्दतीने समाविष्ट केलेला आहे. इ ३ री ते इ. ५ वी चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता १ ली ते ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकावर, माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
अभ्यास संदर्भ साहित्य :-
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
संबंधित विषयांची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इ. १ ली ते १० वी ची पाठ्यपुस्तके

हे पण वाचा -
1 of 15

पेपर(२) (इ. ६ वी ते ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
महत्त्वाचे –
“पेपर दोन देतांना ज्यांची पदवी विज्ञान आहे त्याना घटक चार विज्ञान व गणित विषयावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात आणि ज्यांची पदवी कला शाखेतील आहे त्यांना घटक पाच समाजिकशास्त्रे इतिहास व भूगोल या घटकावरील 60 प्रश्न सोडवावे लागतात.”

१) भाषा-१ व २) भाषा-२ पाठ्यक्रमाची (Syllabus) व्याप्ती :-
या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१मराठी/इंग्रजी/उर्दुबंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी
भाषा-२इंग्रजी किंवा मराठी
इ. ६ वी ते ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील.
यामध्ये दोन्ही भाषेतील व्याकरण/उतारे/लेखक/कविता इत्यादींवर प्रश्र्न विचारले जातात.
संदर्भ साहित्य –
मराठी भाषा(30 गुण)
बाळासाहेब शिंदे/मो.रा.वाळींबे
इंग्रजी व्याकरण(30 गुण)
बाळासाहेब शिंदे/के सागर

३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र(30 गुण)
अभ्यास संदर्भ साहीत्य –
१.संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (चौथी आवृत्ती),के सागर प्रकाशन

४ अ) गणित व विज्ञान विषय गट :-
गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबधीचे असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.
विज्ञानावरील प्रश्न भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्रा संबंधित मुळ संक्लपनात्मक असतात.
अभ्यास संदर्भ साहित्य
1.गणित (30 गुण)
राज्य शासनाची पुस्तके
अंकगणित – अभिनव प्रकाशन
2. विज्ञान (30 गुण)
राज्य शासन पुस्तके,
सामान्य विज्ञान – सचिन भस्के/अनिल कोलते

४ ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-
सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारतासंबंधित विचारले‌ जातात
अभ्यास संदर्भ साहित्य –
इतिहास (30 गुण)
पाचवी ते बारावी शालेय इतिहास पाठ्यपुस्तके
भूगोल.(30 गुण)
इयत्ता पाचवी ते बारावी भूगोल विषयाची पाठ्यपुस्तके
प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
प्रचलित बी.एड्. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम

50 दिवसांत अभ्यास पुर्ण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन असावे –
दररोज –
1. गणित ,मराठी भाषा,
इंग्रजी हे विषय दररोज करावेत ,यात जेवढा सराव असेल तेवढे तुमचे गुण वाढणार आहेत. या विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळविण्याचे‌ धेय्य आतापासूनच ठेवा.
2. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, परीसर अभ्यास, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे आपापल्या प्राधान्यक्रमानुसार संकल्पना समजुन करुन घ्या.
3. दर चार दिवसाला परीक्षापद्धती(TET Paper1 10.30AM-1PM, TET Paper 2.00PM 2-4.30 PM) नुसार दोन्ही पेपर ची एक एक प्रश्नपत्रिका सोडवा. असे केल्यास परीक्षेपर्यंत तुमच्या 10 ते 14 प्रश्नपत्रिका सोडवुन होतील . ज्यांचा गुण वाढीसाठी नक्की फायदा होईल.
4. ज्या विषयांत चांगले गुण येतातयत ते अजुन उजळणी करुन पक्के करा, आणि ज्यात कमी‌ गुण येत आहेत ते विषय सुरवातीच्या दिवसांत ‌एका मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त पक्के‌‌ करुन घ्या, नंतर फक्त उजळणी करीत रहा.
5. परीक्षा पात्रते विषयी आहे, प्रश्नांची काठीण्यपातळी जास्त नसते, योग्य नियोजन करुन सर्व घटकांच्या “बेसिक संकल्पना” चांगल्या केल्या तर तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळतील.

घटकांच्या एकत्रित तयारीसाठी इतर महत्त्वाचे अभ्यास संदर्भ साहित्य –
1.TET पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक – के’सागर
2. TET पेपर पहिला सराव प्रश्नपत्रिका व TET परीक्षेच्या 2013 ते 2018 च्या मागील 5 प्रश्नपत्रिका संग्रह उत्तरांसह – डॉ.शशिकांत अन्नदाते,के’सागर प्रकाशन
3. TET मार्गदर्शक – विद्याभारती प्रकाशन
4..TET सराव प्रश्नपत्रिका पेपर दुसरा (मागील प्रश्नपत्रिकांसह)- विनायक घायाळ व विद्या देशपांडे, के सागर प्रकाशन

टीईटी परीक्षा, अभ्यासक्रम आणि इतर माहीतीसाठी https://mahatet.in/ या संकेतस्थळावर जाऊन विस्तृत माहिती घेऊ शकता.

योग्य रणनीती आणि वेळेचा सदुपयोग तुम्हाला टीईटी सहज उतीर्ण करुन देईल, TET तयारीसाठी आणि परीक्षेसाठी तुम्हाला मनःपुर्वक शुभेच्छा
– नितिन बऱ्हाटे
9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई ‘ चे संस्थापक/संचालक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

अजून वाचा – IISER पुणेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी भरती – https://wp.me/paqrXr-Xd

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.