कृषी विभागामध्ये २७० पदे रिक्त ; कर्मचाऱ्यांची नियुक्ती कधी होणार ?

करिअरनामा । कृषी विभागातील ४ तालुकाच्या कृषी अधिकाऱ्यांसह २७० पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. या बरोबरच शेतकऱ्यांनाही वेळेवर योजनांचा लाभ देण्यासाठी कसरत करावी लागत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या २७० पदांची  नियुक्ती कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) तालुका कृषी अधिकाऱ्यांसह कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. यात पात्र ठरलेले उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाली. परंतु ते मागील काही महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नवीन शासनाला कारभार हाती घेण्यासाठी लागलेल्या विलंबाचा परिणाम असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.