MCVC अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन । व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय  घेतला आहे.  शैक्षणिक 2020-21 या वर्षाकरिता ही नियमावली लागू होणार आहे. 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी सहा विभागस्तरावर समिती नेमण्यात आली आहे.

नव्या शैक्षणिक सत्राला साधारण जूनपासून सुरवात होणे आवश्यक होते. मात्र, कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन ऑगस्टपर्यंत कायम आहे. शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील, हे निश्चित नाही. त्यामुळे 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय  घेतला आहे.

कोरोना संसर्गामुळे शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याबाबत संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयांच्या सहसंचालकांना कळविले आहे. 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यासाठी विभागस्तरावर स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे.

विभागनिहाय असे होतील 25 टक्के अभ्यासक्रम कमी – 

मुंबई – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम वाणिज्य गटातील सर्व अभ्यासक्रम

पुणे – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अर्धवैद्यकीय गट व पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम व्ही 1, व्ही 2, व्ही 3 व व्ही 4

नाशिक – उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तांत्रिक गटातील सर्व अभ्यासक्रम

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com