“2020 गेमचेंजर सीसॅट तुम्हाला उपजिल्हाधिकारी बनवु शकते”…

करीअरनामा । 2020 राज्यसेवा पूर्व परीक्षा हमखास पास व्हायची असेल तर सामान्य अध्ययन पेपर दुसरा म्हणजे CSAT ला चांगले गुण मिळवायला पाहीजेत , हा पेपरच गेमचेंजर असु शकतो. सराव, सराव आणि सराव ही एकच गोष्ट CSAT मध्ये जास्तीतजास्त गुण मिळवुन देईल तो जर तुम्ही प्रामाणिकपणे करत असाल तर सदर लेख नाही वाचला तरी चालेल पण तरीही “उतारा आकलनासाठी”चा सराव म्हणुन  हा लेख वाचुन घ्या  तेवढीच कमी वेळेत योग्य पद्धतीने CSAT ची तयारी करण्यासाठीचे काही नवीन मुद्दे सापडतील 

MPSC ची पुर्व परिक्षा अंदाजित वेळापत्रकानुसार 5 एप्रिल रोजी होणार आहे, सामान्य अध्ययन 2 म्हणजे CSAT(Civil Service Appitude) चा सराव करण्यास पुरेसा वेळ आहे, त्याकडेच जास्त वेळ द्यावा कारण सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये सगळे सरासरी पातळीवरच असतात, मागील लेखात आपण सामान्य अध्ययन पेपर 1 संबधी चर्चा केली होती, सदर लेखात 2020 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी हे पाहु.

CAST हा पेपर अध्ययनात का आला ?? अधिकारी म्हणुन निवड झाल्यावर कोणती कौशल्य हवी असतात ?? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार आचरण केले तर CSAT ची तयारी खुप सोपी होईल

2015 पासुन 2019 पर्यंत पुर्व‌ परिक्षेचा कटऑफ अनुक्रमे 400 पैकी 145 ते (2018ला) 247, (2019)197 पर्यंत वाढत गेला आहे, हा चढता आलेख पाहिला तर CSAT चा अवघड ते सोपा हा क्रम दिसुन येतो, 2019 ला CSAT चा पेपर 2018 च्या तुलनेत जरा कठीण आला होता म्हणून कटऑफ (GS+CSAT)पण कमी लागला होता, तरीही 2020 साठी दोन्ही पद्धतीने(अवघड किंवा सोपा) तयार राहिले पाहिजे, बरेच विद्यार्थी CSAT ला गृहीत धरतात आणि वर्षभर GS करीत बसतात, गुण समान असतील तर प्राधान्य पण समान द्यायला पाहिजे , तांत्रिक पार्श्र्वभूमी असलेले परिक्षार्थी या पेपर मध्ये सहजरीत्या गुण संपादन करतात, अतांत्रिक परिक्षार्थींनी या विषयाचा बाऊ न करता यात प्राविण्य मिळवले पाहिजे, विशेष म्हणजे CSAT फक्त पुर्व पास होण्यासाठीच लागते मुख्यला तर संपूर्ण सामान्य अध्ययन ज्यांचे चांगले आहे तेच शेवटपर्यंत टिकतात पण त्यासाठी पुर्व पास होणे आवश्यक आहे, आपण आयोगाच्या CSAT च्या अभ्यासक्रमानुसार तयारी समजुन घेऊ

A. Comprehension + Marathi and English Language Comprehension skills(class X/Xll Level) – मुळात उतारा आकलन ही नैसर्गिक क्रिया हवी पण ‘कमी झालेले वाचन’ आणि ‘आयती शिक्षणपद्धती’ यामुळे असा स्वतंत्र घटक ठेवून परिक्षा घ्यावी लागते, तुम्हाला मुळातच विस्तृत वाचनाची सवय असेल तर आपोआपच तुमची आकलनक्षमता चांगली असेल 
उतारा आकलना मध्ये उतार्यांचे प्रकार समजुन घेऊन तयारी करावी, तांत्रिक विषयावरील आणि मानवतावादी पार्श्र्वभूमीवरील उतारे या मधील आपल्याला सोपे वाटतात त्या उतार्यांना प्राधान्य द्यावे

उतारा सोडविताना पुढील गोष्टी लक्षात घेता येतील-

1.आधी उतारा वाचायचा की प्रश्र्न..? याचे उत्तर आपापले शोधुन घ्या , पण आधी उतारा वाचणे योग्य आहे. 
2.उतारा किती मोठा आहे?, प्रश्र्न किती विचारले आहेत? हे निरीक्षण करून घ्या म्हणजे त्यानुसार वेळ देता येतो

  1. उतारा एकाग्रतेने वाचुन उतार्याचा विषय आणि प्रकार समजून घ्या, लेखकाचा दृष्टिकोन आत्मसात करण्याचा प्रयत्न करा
  2. उत्तर निवडताना उतार्यातील माहीतीच वापरा, स्वतःचे पुर्वग्रह करु नका, कधी कधी लेखक वास्तवच्या विरुध्द ही बोलत असतो.
  3. बर्याचदा जो उतारा समजण्यासाठी अवघड असतो त्याचे प्रश्र्न सरळ असतात
    6.उतारा आणि प्रश्र्न पर्याय यामधील  भिन्न/समान शब्दा मुळे गोंधळुन जाऊ नका
  4. प्रश्र्न नीट समजे पर्यंत प्रश्न पुन्हा पुन्हा वाचा, पर्यायाबरोबर भरकटुन जाऊ नका
    8.भाषा कौशल्य आणि शब्दसंपदेवर मेहनत घ्या विशेषत इंग्रजी शब्द
    9.खात्री करण्यासाठी प्रश्नातुन पुन्हा उतार्या कडे जाण्यास टाळाटाळ करु नका
    10.योग्य उत्तर निवडताना सकारात्मक हवे की नकारात्मक हवे यावर कटाक्षाने लक्ष द्या.
  5. प्रत्येक उतार्यात एखादा प्रश्र्न खुपचं आव्हानात्मक असतो, सर्वच प्रश्र्न सोडविण्याच्या अट्टहासाऐवजी अचुकतेवर भर दिलेले कधीही चांगले.
    12.एखाद्या उताऱ्यावरील प्रश्न एकतर सोडवावे किंवा सोडवू नये, उतारा हाती घेतला व नीट मन घातले नाही तर वेळही जातो व गुणही.

दररोजच्या इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र संपादकियामधुन प्रत्येकी एक एक उतारा आकलानाच्या दृष्टीने करावा, उतार्याची तयारी बाजारातील उपलब्ध सर्व पुस्तक प्रश्नसंचातुन करुन घ्यावी, जेवढे जास्त उतारे सोडवाल तेवढी आकलनावरील पकड घट्ट होईल.

B.आंतरवैयक्तिक (संदेशवहनासहित) कौशल्य [Interpersonal skills including communication skills] + तात्विक तर्क आणि विश्लेषण क्षमता [Logical Reasoning and analytical ability]- आंतरवैयक्तिक कौशल्य आणि तर्क, विश्लेषण क्षमता वृद्धिंगत व्हावी, विशिष्ट कीचकट समस्येत योग्य निर्णय घ्यावा,‌ उपलब्ध माहीतीचा वापर करुन अचुक सुवर्णमध्य काढावा या दृष्टिकोनातून विधाने आणि अनुमान/ निष्कर्ष या प्रकारातील प्रश्न येतात, हे प्रश्र्न आव्हानात्मक असतात त्यासाठी विशेष सराव आवश्यक आहे

C. सामान्य बौद्धिक चाचणी[General Mental Ability]- सहजरीत्या गुण मिळवून देणारा घटक आहे या घटकांमध्ये विशेषतः संख्या,अक्षरमालिका, संबंध,क्रम, वय, दिशा, घड्याळ,कोडी, दिनदर्शिका, नातेसंबंध,तुलना,आकृती,प्रतिमा इत्यादी प्रकारातील शाब्दिक आणि अशाब्दिक तार्किक/तात्विक क्षमता तपासली जाते, अंकगणितासारखे यातील सर्व‌ प्रकार सरावाने सोडवुन‌ घ्यावेत, हमखास गुण देणारा हा घटक आहे मात्र उत्तर निवडताना दोन तीन वेळा तपासणे आवश्यक असते. सरावाने सहजता येते.  

D.अंकगणित आणि सामग्री आकलन [Basic numercy, Data Interpretation(class x level)]-  या प्रकारातील प्रश्नांचा भरपुर सराव करावा कारण ही गणिते मुळ आकडेमोडीत असतात, प्रत्येक  प्रश्नांचे ठराविक प्रकार असतात, सरावाने उत्तर चटकन शोधता येते आणि ह्या गणितात गुण घेण्याची शाश्र्वती इतर कोणत्याही प्रकारातील प्रश्नांपेक्षा  जास्त असते . ह्या प्रश्नांचा स्तर दहावी पातळीचा असतो त्यामुळे ठरावीक प्रकार आणि त्यांच्या पद्धतीने सरावाने समजुन घ्याव्यात त्यासाठी आपापली शार्टट्रिक आणि पध्दत विकसित करावी, जलद आकडेमोडी साठी पाढे, वर्ग,वर्गमुळ आणि संबंधित सुत्रे पाठ करुन घ्यावीत. 

या अभ्यासक्रमात विशेषतः संख्या, लसावि-मसावि, सरासरी, गुणोत्तर-प्रमाण, काळ-काम-वेग,वेग-वेळ-अंतर,शेकडेवारी,नफा-तोटा इत्यादी गणिते असतात. याची तयारी दररोज एक प्रकार आणि त्यांची उदाहरणे किंवा दररोज प्रत्येक प्रकारातील 5-5 उदाहरणे या दोनपैकी तुम्हाला अपेक्षित पध्दतीने करु शकता.

सामग्री आकलन ह्या प्रकारात प्रश्र्न समजला आणि व्यवस्थित सोडविला तर 4-5 प्रश्नांचे गुण लगेच मिळुन जातात, अभ्यासक्रमानुसार तक्ते,ग्राफ, सामग्री पर्याप्तता इत्यादी तीन-चार  प्रकारात येतात, या घटकांचे महत्व मागील वर्षी कमी झाले होते तरीही करुन ठेवणे उचित राहील 

E.. निर्णय क्षमता आणि समस्या निवारण[Decision-Making and Problem- solving] – निर्णय क्षमता हा घटक आता विचारला जात नाही, पण समस्या निवारणावरचे पानभरुन(वेळ घेणारे) प्रश्र्न विचारले जातात तेही शेवटी. या प्रश्नांच्या विशेष सरावासाठी स्त्रोत नाहीत,‌पण सद्दविवेक बुध्दी, संविधानिक नैतिकता आणि वास्तवादी दृष्टिकोनातुन संबंधित प्रश्नांची उत्तरे देता येतात. खात्रीशीर उत्तर माहीत असेल तरच प्रश्न सोडविण्याची रिस्क घेता येते.

 कोणत्या घटकावर किती प्रश्र्न येतील यांची आपण खात्री देऊ शकत नाही, घटकांची तयारी करताना मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन आणि आपापला जमणारा-नजमणारा घटक यानुसार ‌प्राधान्यक्रम देऊन सगळे घटक चतुरस्त्र पध्दतीने तयार करुन घ्यावेत.  त्यासाठी पुढील शंभरेक दिवसाचे उतारे आणि गणित-बुध्दिमत्ता या भागात विभाजन करून तयारी करता येईल.

‘परिक्षेच्या एक ते दीड महीना आधी मागील पाच वर्षाचे पेपर दर रविवारी वेळ लावुन तयारीनिशी सोडवावेत आणि पेपर झाल्यावर चुका/कमतरता लिहुन काढाव्यात त्यांच्यावर येणार्या आठवड्यात काम करावे ” याचा नक्की फायदा होईल.

पुर्व परिक्षेत एकच संधी आहे वरीलपैकी कोणत्याही घटकावरील प्रश्र्न आले तरी  व सहजतेने सुटले पाहिजेत, एखादा चुकलेला प्रश्र्न एक वर्ष थांबायला लावु शकतो म्हणुन CSAT मधील सर्वच घटकांवरील प्रश्र्न सर्व वारंवारता/शक्यता पडताळून तयार करुन घेतले पाहिजेत

राहिलेल्या वेळेनुसार CSAT चा आयोगाधारीत विस्तृत प्रश्र्न सराव, GS चा योग्य दिशेत अभ्यास आणि वेळेचे काटेकोर नियोजननच राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण करुन देईन, आत्मविश्वास आणि मेहनत असेल तर पुर्व पास होणे कठीण नक्कीच नाही. कारण “असाध्य ते साध्य, करिता सायास कारण अभ्यास, तुका म्हणे

नितिन बऱ्हाटे
9867637685
(लेखक “लोकनीति IAS, मुंबई”चे संस्थापक/संचालक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]