मोठी बातमी !!MNC मध्ये 2 लाख जागांसाठी भरती होणार; पुण्यासह ‘या’ शहरात नोकऱ्यांची संधी…

करिअरनामा ऑनलाईन । मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक मोठी बातमी आहे. नोकरीच्या मागे धावणाऱ्या युवकांची पायपीट आता थांबणार आहे. भारतात लवकरच नोकऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जगभरातल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतात जवळपास 1.80 ते 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत. अमेक्स, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले यासारख्या अनेक कंपन्यांनी भारतात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोविड-19 च्या केसेसमध्ये घट झाल्यामुळे बहुतेक कंपन्या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत बोलवणार आहेत. या धर्तीवर कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत आणण्यासाठी उत्साह दाखवला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. मात्र लसीकरणानंतर ही परिस्थिती बदलली आहे. बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करुन आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपन्यांमध्ये नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नव्हती. आता मात्र या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. एका इंग्रजी वृत्त पत्राच्या माहितीनुसार भारतात फर्म असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्यानी आता भारतात 1.80 लाख ते 2 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे.

2023 च्या अखेरीस चेन्नई, वडोदरा आणि पुणे या तीन जागतिक केंद्रांवर देशातील 5,000 पेक्षा जास्त लोकांना नोकरीवर घेण्याची योजना कंपन्या आखत आहेत. Deutsche India या कंपनीने या वर्षी 3,000 लोकांना कामावर ठेवण्याची योजना आखली आहे हि बाब नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंददायी आहे.

…या कंपन्यांकडून भारतात मोठी भरती होणार – 

  1. Amex
  2. Bank of America
  3. Wells Fargo
  4. City, Barclays
  5. Morgan Stanley
  6. HSBC
  7. Standard Chartered
  8. Goldman Sachs
  9. Amazon
  10. Target
  11. Walmart
  12. Shell
  13. GSK
  14. Abbott
  15. Pfizer
  16. AstraZeneca

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com