शिक्षण विभागाचा बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा !

करिअरनामा ऑनलाईन । यंदा बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. फक्त या चालू वर्षासाठीच विद्यार्थ्यांना हा दिलासा असेल. बारावीसाठी शाखानिहाय गट ए, बी, सी मध्ये विषयांची विभागणी करण्यात आली आहे.

बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर पूर्ण पुस्तकाचा अभ्यास केला पण काही भाग वगळल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. जो अभ्यासक्रम परीक्षेला आहे त्याचा अभ्यास न झालेले अनेक विद्यार्थी आहेत. यानुसार काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. मात्र या आदेशाकडे अनेक जुनिअर कॉलेज आणि शिक्षकांचं दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभर वगळलेल्या विषयांचा अभ्यास केलाय.

या गोंधळानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी विषय कसे निवडायचे? निवडलेल्या नवीन विषयांचा एक-दोन महिन्यांत अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जातोय. दरम्यान विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने यावर्षी जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळाला आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लीक करा   आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com