[दिनविशेष] 03मे । जागतिक पत्रकारिता दिन

करिअरनामा । जागतिक पत्रकारिता दिन किंवा  जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन म्हणून प्रसिद्ध असलेला आजचा दिवस संयुक्त राष्ट्र संघाने नियोजित, आयोजित आणि प्रचारित केलेल्या कॅलेंडरमधील एक कार्यक्रम आहे. दरवर्षी 3 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन 2020: थीम
“भीती किंवा प्रलोभनाशिवाय पत्रकारिता” अशी आहे. तसेच इतर 03 लक्ष्यपार  थीम ठेवण्यात आल्या आहेत.
1.महिला व पुरुष पत्रकार आणि मीडिया कामगारांची सुरक्षा.
2.राजकीय आणि व्यावसायिक प्रभावापासून मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारिता.
3.माध्यमांच्या सर्व बाजूंमध्ये लिंग समानता.

आजचा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या महत्त्व संदर्भात जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.  पत्रकार स्वातंत्र्य आणि व्यावसायिक आचारसंहिता या विषयांबद्दल मीडिया व्यावसायिकांमध्ये हा दिवस महत्त्वाचा आहे.

जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन हा माध्यमांना पाठिंबा देणारा दिवस आहे. तसेच बातमीच्या किंवा सत्य/गूढ बातमीच्या मागे लागून आपला जीव गमावलेल्या त्या सर्व पत्रकारांच्या आठवणीचा दिवसही आहे.

युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सच्या सूचनेनंतर डिसेंबर 1993 मध्ये यूएन जनरल असेंब्लीने जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनाची घोषणा केली. तेव्हापासून विंडोहकच्या घोषणेचा वर्धापन दिन 03 मे पासून जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन म्हणून जगभरात आजचा दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय पत्रकार दिन :-16 नोव्हेंबर

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-