बेरोजगारीने त्रस्त असलेल्या महिलेची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

करिअरनामा । कांदिवली पश्चिम येथे एका 40 वर्षीय महिलेने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना 2 जानेवारी रोजी चारकोप येथे घडली. डिंपल वाडीलाल असं या मृत महिलेचं नाव आहे. तिची आई म्हणाली की, ‘गेल्या काहीदिवसांपासून डिंपलकडे जॉब नव्हता. त्यामुळे ती डीप्रेशनमध्ये गेली होती. तसेच तिचे लग्नही झाले नव्हते.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. महिला आठव्या मजल्यावरुन उडी मारत आहेत. तर खाली काही लोक तिला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या दरम्यान महिलेने उडी घेत आत्महत्या केली.

पोलिसांनी घटनास्थळावरुन डींपलचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची अधिक चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]