अशोका युनिव्‍हर्सिटीच्या प्रतिष्ठित ‘यंग इंडिया फेलोशिप’ कोर्ससाठी प्रवेश सुरू

मुंबई | अशोका युनिव्‍हर्सिटीचा प्रमुख एक-वर्षाचा मल्‍टी-डिसीप्‍लीनरी (निवासी पदव्‍युत्‍तर डिप्‍लोमा कोर्स) ‘यंग इंडिया फेलोशिप’च्‍या अध्‍ययन अभ्‍यासक्रमाच्‍या दहाव्‍या बॅचसाठी प्रवेशाचा दुसरा टप्‍पा सुरू झाला आहे. प्रवेशाच्‍या दुस-या टप्‍प्‍याची अंतिम मुदत २ फेब्रुवारी २०२० आहे. या कोर्ससाठी अर्ज करण्‍याचा तिसरा व अंतिम टप्‍पा ३ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू होऊन ३१ मार्च २०२० रोजी बंद होईल.

पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया

कोणत्‍याही शाखेमधील मान्‍यताप्राप्‍त पदवीधर किंवा पदव्‍युत्तर पदवी असलेले (अंतिम वर्षात शिकत असललेल देखील) आणि १५ जुलै २०२० रोजी २८ वर्षांपेक्षा अधिक वय नसलेले उमेदवार अर्ज करण्‍यासाठी पात्र आहेत. कामाचा अनुभव असलेले उमेदवार देखील पात्र आहेत.

अर्जाचे सखोल मूल्‍यांकन, टेलिफोनिक मुलाखत आणि लेखी आकलन चाचणी व मुलाखतीच्‍या अंतिम फेरीनंतर मूल्‍यमापन करण्‍यात येते. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी काही अवधी लागतो. बहुतांश वेळ निबंध लिहिण्‍यामध्‍ये जातो. यामध्‍ये उमेदवारांना त्‍यांच्‍यासाठी महत्त्‍वाच्‍या असलेल्‍या गोष्‍टी, त्‍यांचा वैयक्तिक प्रवास आणि त्‍यांना वायआयएफकडून काय अपेक्षा आहेत यासंदर्भात लिहिण्‍यास सांगितले जाते.

वायआयएफ आर्थिक साह्य आणि अर्ज शुल्‍क

अशोका युनिव्‍हर्सिटी भारतीय उच्‍च शिक्षणामधील अनपेक्षित उपक्रम सामूहिक परोपकारी व संघटित शासन मॉडेलसाठी ओळखली जाते. वायआयएफ विद्यार्थ्‍यांना गरजेनुसार १०० टक्‍के आर्थिक साह्य करते आणि कोर्ससाठी अर्ज करण्‍यासाठी कोणतेच शुल्‍क आकारले जात नाही. सध्‍याच्‍या वायआयएफ विद्यार्थीवर्गापैकी दोन-तृतीयांश विद्यार्थ्‍यांना काही स्‍वरूपात आर्थिक साह्य करण्‍यात आले आहे. जवळपास ३० टक्‍के विद्यार्थ्‍यांना १०० टक्‍के शिक्षण शुल्‍क माफ करण्‍यात आले आहे.

वायआयएफ, सध्‍याचा विद्यार्थीवर्ग आणि माजी विद्यार्थी समुदायाबाबत

२०११ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली वायआयएफ विविध शैक्षणिक, व्‍यावसायिक, सामाजिक-आर्थिक व भौगोलिक क्षेत्रांमधील ३०० हुशार विद्यार्थ्‍यांना एकत्र आणते आणि त्‍यांना आधुनिक शैक्षणिक अनुभवांची ओळख करून देते. ज्‍यामुळे या विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या बौद्धिक व व्‍यावसायिक क्षमता वाढवण्‍यामध्‍ये मदत होते.

वायआयएफच्‍या वर्गामध्‍ये सामान्‍यत: अर्थशास्‍त्रज्ञ, डॉक्‍टर्स, कलाकार, वकिल, अभियंते, संगीतकार, व्‍यवसाय व साहित्‍य पदवीधर, उद्योजक, लेखक, चित्रपट निर्माते आणि विविध क्षेत्रांमधील लोकांचा समावेश असतो. तरूणांना भावी प्रभावशाली प्रमुख बनवण्‍यासाठी प्रशिक्षण देण्‍याचा मुख्‍य हेतू आहे. त्‍यांनी कोणताही करिअर मार्ग निवडला असला तरी सार्वजनिक सेवेप्रती प्रबळ कटिबद्धता दाखवली जाते.

विद्यार्थी शैक्षणिक वर्षमध्‍ये अभ्‍यासाच्‍या अद्वितीय क्षेत्रांमधील जवळपास २० विषयांचा अभ्‍यास करतात. ऑफर करण्‍यात आलेला प्रत्‍येक कोर्स विशिष्‍ट शैक्षणिक किंवा व्‍यावसायिक क्षेत्राशी संबंधित असतो. विज्ञान ते सामाजिक शास्‍त्र आणि नेतृत्‍व ते कला अशा शाखांचा यामध्‍ये समावेश आहे. ऑफर करण्‍यात येणा-या कोर्समध्‍ये सार्वजनिक धोरण, कला कौतुक, लिंग आणि माध्यम अभ्यास, नेतृत्व, गट गतीशास्त्र, व्यवसायातील आवश्यक गोष्टी, शेक्सपियर, संप्रेषण आणि भारतीय निवडणुका यांचा समावेश आहे.

शैक्षणिक अभ्‍यासक्रमाव्‍यतिरिक्‍त विद्यार्थ्‍यांना ८ महिन्‍यांचा क्रिटिकल राइटिंग प्रोग्राम, तसेच एक्‍स्‍पेरिएन्शियल लर्निंग मॉड्युल (सहयोगी संस्‍थेसोबत रिअल-वर्ल्‍ड समस्‍या विधानावरील मुदत आधारित प्रकल्‍प) यांचे देखील शिक्षण दिले जाते. हे दोन्‍ही अभ्‍यासक्रम वायआयएफचे मुलभूत घटक आहेत. हा अभ्‍यासक्रम २१व्‍या शतकातील निर्णायक विचारसरणी, समस्या निराकरण, प्रभावी संप्रेषण आणि सहानुभूतीशील नेतृत्व अशा कौशल्‍यांना आकार देतो. शैक्षणिक क्षेत्र असो किंवा व्‍यावसायिक क्षेत्र असो, कोणत्‍याही करिअरमध्‍ये यशस्‍वी होण्‍यासाठी ही कौशल्‍ये आवश्‍यक आहेत.

शिक्षकवर्ग, अभ्‍यासक्रम आणि विद्यार्थ्‍यांमधील देवाणघेवाणची सुविधा देण्‍यासाठी अशोका युनिव्‍हर्सिटीने जागतिक दर्जाच्‍या संस्‍थांसोबत सहयोग जोडला आहे. युनिव्‍हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानिया, युनिव्‍हर्सिटी ऑफ मिशिगन, किंग्‍ज कॉलेज लंडन, सायन्‍सेस पो, एचईसी पॅरिस, त्रिनिटी कॉलेज डबलिन, युनिव्‍हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली, स्‍टॅनफोर्ड युनिव्‍हर्सिटी, टेल अॅविव युनिव्‍हर्सिटी, ड्यूक युनिव्‍हर्सिटी आणि येल युनिव्‍हर्सिटी यांच्‍यासोबत सहयोग जोडण्‍यात आला आहे.

सध्‍याच्‍या वायआयएफ विद्यार्थीवर्गामध्‍ये (२०१९-२०चा वर्ग) २५ हून अधिक भारतीय राज्‍ये व केंद्रशासित प्रदेशांमधील १२० हून अधिक गाव, नगर व शहरांमधील ३०१ विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. ते १८० हून अधिक पदवीधर संस्‍थांचे प्रतिनिधित्‍व करतात आणि त्‍यांच्‍यापैकी ५० टक्‍के विद्यार्थ्‍यांना कामाचा अनुभव आहे. सामान्‍यत: वायआयएफमध्‍ये महिला विद्यार्थ्‍यांची संख्‍या अधिक आहे.

१४०० हून अधिक वायआयएफ माजी विद्यार्थी समुदायाने विविध करिअर क्षेत्रामध्‍ये उत्तम कामगिरी केली आहे. ते ३० हून अधिक देशांमध्‍ये राहत आहेत.

”फेलोशिपच्‍या अनुभवात्‍मक घटकामुळे माझ्यामध्‍ये एका अभियंतावरून पर्यावरणाप्रती एक उत्‍साही समर्थक बनण्‍यापर्यंत बदल झाला. यामुळे मला माझ्या आवडींना नवीन रूप देण्‍यामध्‍ये मदत झाली आणि मला तळागाळापासून प्रकल्‍प डिझाइन करण्‍यासाठी विचार कराव्‍या लागणा-या गोष्‍टींबाबत समजले.”
– राधिका सुंदरेसन, वायआयएफ २०१५-१६; फुलब्राइट स्‍कॉलर इन एन्‍व्‍हायरोन्‍मेंटल सायन्‍स, येल युनिव्‍हर्सिटी
माजी विद्यार्थी हार्वर्ड, स्‍टॅनफोर्ड, सेल, पेन, ब्राऊन, कोलंबिया यूसी बर्कली, ऑक्‍सफोर्ड, केंब्रिज, एमआयटी, एनयूएस, किंग्‍ज कॉलेज लंडन, सायन्‍स प्रो, टीयू डेल्‍फ्ट अशा अव्‍वल जागतिक संस्‍थांमध्‍ये मास्‍टर्स व डॉक्‍टरेट शिक्षण घेत आहेत. तसेच माजी विद्यार्थ्‍यांना जगातील सर्वात प्रतिष्ठित शिष्‍यवृत्त्‍या देखील मिळाल्‍या आहेत. वायआयएफच्‍या माजी विद्यार्थ्‍यांमध्‍ये बारा फुलब्राइट स्‍कॉलर्स अव्‍वल यूएस संस्‍थांमध्‍ये मास्‍टर्स पदवीचे शिक्षण घेत आहेत. इतर शिष्‍यवृत्त्‍यांमध्‍ये र्‍होड्स, श्वार्झमन, कॉमनवेल्थ, चेव्हनिंग आणि इनलॅक्स यांचा समावेश आहे.

वायआयएफच्‍या माजी विद्यार्थ्‍यांनी ५० हून अधिक उद्यम सुरू केले आहेत. एक-तृतीयांश माजी विद्यार्थी समुदाय विकास क्षेत्रामध्‍ये कार्यरत आहे. अनेकजण जगभरातील अव्‍वल धोरण, शिक्षण आणि कॉर्पोरेट संस्‍थांमध्‍ये छाप पाडत आहेत.

अधिक माहितीसाठी www.youngindiafellowship.com येथे भेट द्या आणि ऑनलाइन अर्ज करण्‍यासाठी www.apply.ashoka.edu.in येथे भेट द्या.

अशोका युनिव्‍हर्सिटी बाबत:

अशोका युनिव्‍हर्सिटी ही सोनेपत, हरियाणामध्‍ये स्थित भारताची आघाडीची लिबरल आर्ट्स अॅण्‍ड सायन्‍स युनिव्‍हर्सिटी आहे. अशोकाच्‍या भारतातील २८ हून अधिक राज्‍ये व ९८ शहरांमधील, तसेच १५ इतर देशांमधील २००० हून अधिक विद्यार्थ्‍यांना जागतिक, आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रख्‍यात शिक्षकवर्गाकडून जागतिक दर्जाचे इंटरडिसीप्‍लीनरी शिक्षण मिळते. अशोका युनिव्‍हर्सिटीने शैक्षणिक व संशोधन सहयोगांना चालना देण्‍यासाठी आणि सामाजिक परिणाम निर्माण करण्‍यासाठी सात सेंटर्स ऑफ एक्‍सलन्‍स देखील विकसित केले आहेत.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.