स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट

Get real time updates directly on you device, subscribe now.

स्पर्धापरिक्षा अभ्यासनिती | नितिन ब-हाटे

कोणताही खेळ जिंकण्यासाठीच खेळला पाहिजे, आणि जिंकण्यासाठी त्या खेळाचे सर्व नियम आणि डावपेच माहीती पाहिजेत, मागील लेखात आपण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा याबद्दल जाणुन घेतले, आता स्पर्धा परिक्षां‌च्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट समजुन घेऊ

“सुर्य आणि सुर्याखालचे सर्व काही” असा अभ्यास असलेली परिक्षा म्हणुन या परिक्षांकडे पाहिले जाते, या परिक्षांचा आवाका मोठा आहे आवाका समजण्यासच प्रथम काही काळ जातो त्यानंतर हा अतिप्रचंड अभ्यासक्रम आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रयत्न वस्तुनिष्ठ आणि नियोजनबद्ध असावा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा परिक्षार्थींनी अट्टाहास कायम ठेवावा परंतु वेळ आणि वेगाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी वेळेत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी योग्य रणनीती कायम उपयोगी ठरते.

स्पर्धापरिक्षा वेळ, वेग आणि आक्रमकता या त्रिसुत्री मध्ये पार करणारा उमेदवार लवकर यशस्वी होऊ शकतो, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वेगाने अभ्यासक्रम पूर्ण करणे, जास्तीत जास्त उजळणी करणे, सराव चाचण्या देणे, अपयश आले तरी त्याचं आक्रमकतेने पुन्हा लढत राहणे हेच यशाचे गमक आहे.

स्पर्धा परीक्षांची योग्य रणनीती आखण्यासाठी पुढील चौकट आहे

. आयोगाचा अभ्यासक्रम(UPSC, SSC, MPSC)

. मागील वर्षी विचारलेले प्रश्न आणि चालु घडामोडी

. सराव चाचण्या

. स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखुन मार्गक्रमण

हे पण वाचा -
1 of 14

आयोगाचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षी विचारलेले प्रश्न या आधारे स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखुन सध्या घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी याआधारे रणनीती बनवायची असते

उदाहरणार्थ जी परिक्षा टार्गेट करावयाची आहे तीचा प्रथम अभ्यासक्रम पाठ करुन घ्यावा ,मग या परिक्षेच्या आधी झालेल्या प्रश्नपत्रिका बारकाईने अभ्यासाव्यात त्यानुसार प्रत्येक घटकाची पुस्तके/अभ्याससाहित्य निवडावे आपल्याला समजणारे आणि न समजणारे यानुसार प्रत्येक घटकाला कमी जास्त (आपल्या क्षमता आणि मर्यादा नुसार) महत्त्व देऊन अभ्यास करावा. सर्व अभ्यास मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषण करता करता चालु घडामोडी वर लक्ष ठेवीत करीत रहावा.

स्पर्धापरिक्षांमध्ये चालु घडामोडीनां विशेष महत्व असते त्यामुळे चालु घडामोडी आणि त्याची बेसिक संकल्पना अशा जोडीत अभ्यास असावा

अशारीतीने तीनवेळा व्यवस्थित वाचन आणि बर्याचदा रिव्हीजनस् झाल्यावर जमेल तेवढ्या स्वतःवेळ लावुन सराव चाचण्या दयाव्यात, चाचणी झाल्यावर बरोबर/ चुक प्रश्नांचे पर्यायाने त्या घटकांचे विश्लेषण करावे चुकत असलेले घटक सुधारण्याचा प्रयत्न करीत रहावा. बरोबर घटकांची उजळणी करीत रहावे.

वरील चौकटीमध्ये स्पर्धापरिक्षाच्या अभ्यासाची रणनीती असावी.

“सध्या स्पर्धा परिक्षां मध्ये अभ्यासाच्या विषयानुरूप खोली पेक्षा अभ्यासाचा परिघ विस्तार अधिक आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयाच्या खोलवर ज्ञाना पेक्षा अधिकाधिक विषयांचे विश्लेषणात्मक ज्ञान असणे अपेक्षित आहे”

“Patience, Persistence and Perspiration make an unbeatable Combination for Success – Nepolean Hill.”

तुमच्या प्रवासात तुमची स्वत:च्या अभ्यासावरील आणि मार्गदर्शकावरील निष्ठा कायम असावी , म्हणजे स्पर्धापरिक्षेतील यश लवकर मिळते.

 

नितिन ब-हाटे.
9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई’ चे संचालक/ मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत.)

Get real time updates directly on you device, subscribe now.